इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

वाढत्या महागाईने अच्छे दिनचे भंगले

नीरा – गेल्या काही महिन्यात पेट्रोल व डीझेलच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामानाने दरातील घटीचे प्रामाण कमी असल्याने इंधनाच्या किमतीत वाढ झालेली आहे. सध्या पेट्रोल 85.62 रुपये प्रती लिटर तर डीझेल 72.09 रुपये प्रतीलिटर असून हा दर सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने इंधन दरवाढीने गोरगरीब लोकांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात इंधन दरवाढीमुळे एसटी प्रवास, मालवाहतूक तसेच खासगी प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ होत आहे.

अच्छे दिन येण्याचे स्वप्न दाखवल्याने गोरगरिबांनी मोदी सरकार निवडून दिले. सरकार बहुमतात आल्यावर घरगुती गस सिलिंडर, पेट्रोल डीझेलच्या किमतीतील वाढ, जीएसटीचा फटका गोरगरिबांना बसला. नोटाबंदी नंतर अर्थव्यवस्था आता कुठे रुपाला येत असताना पेट्रोल, डीझेलचे वाढणारे भाव गोरगरिबांना सोसणारे नाहीत. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने इंधनाच्या किमतीत सतत होणारी भाववाढीचा फटका फडणवीस सरकारला बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना सरकारकडून राबविल्या जात असल्या तरी खऱ्या अर्थाने त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. एकंदरीत वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांच्यात नाराजी असून अच्छे दिन दाखवण्याचे स्वप्न केवळ “गाजर’ असल्याची मते व्यक्त होताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)