इंधन जीएसटीत आणून किंमतीत फार फरक पडणार नाही

सुशिलकुमार मोदी यांचे प्रतिपादन
पाटणा – पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीत अंतर्भा करणे हाच इंधनाचे दर कमी करण्याचा रास्त उपाय आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारतर्फे तसेच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वारंवार केले असले तरी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी मात्र त्या मताशी फारकत घेतली आहे. इंधनाचा समावेश जीएसटी मध्ये केल्याने त्याचा फारसा उपयोग होणार नाही आणि फार किंमती उतरणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

सुशिलकुमार मोदी हे जीएसटी कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला महत्व आहे. त्यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना इंधनाचे दर जीएसटीत आणण्यास विरोध केला. ते म्हणाले की राज्यांनी इंधनावर त्यांच्यात्यांच्या अखत्यारीत सेस किंवा व्हॅटचा कर लागू केला असला तरी तो एकूण किमंतीच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. त्या करांमुळेच राज्यांना विकासासाठी पैसा उपलब्ध होत असतो. राज्यांचा तो अधिकारही काढून घेतला तर विकासासाठी राज्यांना कुठून पैसे मिळणार असा सवाल त्यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवाय असे करण्याने इंधनाच्या किमंतीवर फार फरक पडणार नाहीं असे त्यांनी म्हटले आहे. तथापी केंद्र सरकारने मात्र राज्य सरकारांनी अनुमती दिली तरच इंधनाचा समावेश जीएसटीत केला जाईल असे म्हटले आहे. सध्या इंधनावर केंद्र सरकारने भरमसाठी उत्पादन शुल्क लावले आहे. तसेच राज्यांचेही वेगवेगळे कर लागू आहेत. त्यामुळे इंधनाचे दर चढे आहेत. इंधनाचा समावेश जीएसटीत केला तर त्यावर कमाल 28 टक्के इतकाच एकसमान कर लावता येईल आणि त्यामुळे आपोआप इंधनाच्या किमंती कमी होतील असे अनेकांचे म्हणणे आहे. पण हा युक्तिवाद सुशिलकुमार मोदी यांनी मात्र फेटाळून लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)