इंधनांच्या चढ्या दरांतून कुणाचे खिसे भरले जात आहेत?

राहुल यांचा मोदींना सवाल
रीवा – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून शुक्रवारी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. इंधनांच्या चढ्या दरांतून कुणाचे खिले भरले जात आहेत? इंधन दरवाढीबाबत मोदी बोलत का नाहीत, असा सवाल राहुल यांनी केला.

केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना जागतिक बाजारपेठेतील कच्च्या इंधनाची किंमत प्रतिपिंपामागे 140 डॉलर्स इतकी होती. आता ती किंमत निम्म्याने खाली आली आहे. तरीही भारतातील इंधनांचे दर वाढतच आहेत. जनतेला 50 रूपयांत पेट्रोल मिळतेय ना, असे मोदी आधी त्यांच्या भाषणांतून विचारायचे. त्यांच्या प्रश्‍नाला हो असे उत्तर द्यावे लागेल. त्या दरात पेट्रोल मिळतेय; पण ते अर्धा लिटर, असे राहुल म्हणाले. लवकरच विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या मध्यप्रदेशचा राहुल यांनी दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी एकप्रकारे कॉंग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी राहुल यांची रीवा जिल्ह्यात सभा झाली. या सभेत त्यांनी इंधन दरवाढीबरोबरच राफेल, शेतकऱ्यांच्या समस्या आणि इतर मुद्‌द्‌यांवरून मोदींवर शाब्दिक हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही लक्ष्य केले. मध्यप्रदेशातील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. मात्र, आमचे रस्ते अमेरिकेपेक्षाही चांगले असल्याचा दावा चौहान करतात. ते केवळ घोषणा करतात. काम करत नाहीत. चौहान व्यासपीठावर आल्यावर घोषणा मशीन आले अशी खिल्ली छोटी मुलेही उडवतात, असा शाब्दिक टोला राहुल यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)