इंद्राणी मुखर्जीकडून पती पीटर मुखर्जीला घटस्फोटाची नोटीस

मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सहआरोपी आणि पती पीटर मुखर्जीला स्पीड पोस्टने घटस्फोटाची नोटीस पाठवली आहे. शीना बोरा हत्याकांड प्रकरणी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी सध्या तुरुंगात आहेत.

इंद्राणीने सामंजस्यातून पीटर मुखर्जीपासून फारकत मिळवण्यासाठी नोटीस पाठवली आहे. घटस्फोटाच्या या नोटीसमध्ये स्पेन आणि लंडनमधील संपत्ती, बँकेतील फिक्स डिपॉझिट्स आणि अन्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांमधील गुंतवणुक यात विभागणी करण्याचा उल्लेख आहे. 10 नोव्हेंबर, 2002 साली पीटर आणि इंद्राणीचे हिंदू पद्धतीने लग्न झाले होते. तरी, घटस्फोटासाठी एकमेकांविरुद्ध कुठल्याही न्यायालयात अर्ज न करता सांमजस्याने घटस्फोट घेण्यात यावा यासाठी इंद्राणीने ही नोटीस पाठवली आहे. दरम्यान पीटरच्या वकीलांनी अशी नोटीस अजून मिळाली नसल्याचे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)