इंदोरी येथे शारदामाई यांच्या जन्मदिनी निमित्त ग्रंथदिंडीचे आयोजन

इंदोरी – जीवनविद्या मिशन मुंबई, तळेगाव दाभाडे शाखेतर्फे सदगुरू श्री वामनराव पै यांच्या पत्नी शारदामाई यांच्या जन्मदिनी निमित्त जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदोरी गावामध्ये जीवन विद्येच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचाराचा एक भाग म्हणून ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते.

या दिंडीचे उद्‌घाटन इंदोरी गावचे उपसरपंच अंकुश ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या दिंडीमध्ये धार्मिक ग्रंथांचा समावेश केलेला होता तसेच या धार्मिक ग्रंथांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. समाजात असणारे ग्रंथज्ञानाचे महत्व व माणसाने आयुष्यात काय करावे, का करावे, काय करू नये हेच ग्रंथ सांगतात आणि विशेष म्हणजे ग्रंथांमध्ये लिहिलेले ज्ञान हे कोणत्याही काळात लागू पडते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता त्या काळी अर्जुनासाठी जितकी उपयुक्‍त होती. तितकीच ती आताच्या 21 व्या शतकातही आहे. अशी माहिती ग्रंथदिंडीद्वारे नागरिकांना देण्यात आली.

ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याचा जितका उपयोग आपण करून घेऊ तितके आपणच समृद्ध होत जाऊ. ग्रंथ आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात, असे यावेळी उपसरपंच अंकुश ढोरे यांनी सांगितले. या वेळी शाखा अध्यक्ष शेखर रहाणे, शाखा सचिव मारुती वाळुंज, ग्रंथदिंडी प्रमुख शरद बोर्गे, विनायक कदम, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ चव्हाण, प्रशांत सुतार व इंदोरी ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)