इंदापूर लोकअदालतीत सव्वा कोटींची वसूली

इंदापूर – इंदापूर न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत 4 हजार 628 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.त्या पैकी 2 हजार 494 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. तर एक कोटी 39 लाख 83 हजार 261 रूपये इतकी थकित रक्कम वसूल झाली असून पुणे जिल्ह्यातील ही उच्चांकी वसुली असल्याची माहिती इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अ. अ. शेख.यांनी दिली.
राष्ट्रिय विधी सेवा प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार भारतातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार इंदापूर न्यायालयात या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत बऱ्याच कालावधीपासून प्रलंबीत असणारे दिवाणी दावे, तडजोडीस पात्र असलेले फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर झालेले कलम 138 चे प्रकरणे, तसेच इंदापूर तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद यांच्याकडील थकित पाणी पट्टी व घरपट्टीची दाखलपूर्व प्रकरणे, इंदापूर तालुक्‍यातील सर्व बॅंकाकडील थकित कर्जाऊ दाखलपूर्व प्रकरणे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची थकित बीलाची दाखलपूर्व प्रकरणे व पोलीस ठाण्यातील अदखलपात्र गुन्हे असे एकूण 4 हजार 628 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 2 हजार 494 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. तर 1 कोटी 39 लाख 83 हजार 261 इतकी उच्चांक्की रक्कम वसुल झाली आहे.
या न्यायालयामध्ये एकूण पाच पॅनल तयार करण्यात आले होते. त्यामध्येइंदापूर न्यायालयामध्ये कार्यरत न्यायाधीश अ. अ. शेख, पी. एन. कुलकर्णी, एन. ए. शेख, एन. पी. देशपांडे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले, तर ऍड. ऋषीकेश कोथमिरे, ऍड. आर. आर. शुक्‍ला, ऍड. अजिम शेख, ऍड. विनोद पारेकर, ऍड. एम. एल. आदलिंग, ऍड. शेलार, ऍड. अदिकराव व्यवहारे, ऍड. धनंजय दिक्षित यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मधुकर ताटे, उपाध्यक्ष अशपाक सय्यद, बापू साबळे, सचिव किरण लोंढे, सचिन चौधरी, अवधूत डोंगरे, संदिप शिंदे, अण्णा व्यवहारे, अमोल कोठारी, एन. एस. शहा, महेश शिंदे व इतर ज्येष्ठ विधीज्ज्ञ यांनी सहकार्य केल्याची माहिती दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एस. आर. नगर यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)