इंदापूर तालुक्‍यात 329 मतदान केंद्रे सज्ज

रेडा- लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुक्‍यात 329 मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावरील साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण सोळुंके व अतिरिक्‍त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार सोनाली मेटकरी व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली मशीन वाटप करण्यात आले. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार रवीकांत बनसोड, दामोदर राठोड, दीपक पवार, भास्कर ओहाळ, शुभांगी अभंग, संतोष अनगरे, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, भूमी अभिलेख अधीक्षक गणेश कराड, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता धनंजय वैद्य, सुधीर गाडेकर यांनी काम पाहिले. प्रत्येक मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना दोन बॅलेट युनिट, एक व्हीव्हीपॅट मशीन, एक कंट्रोल युनिट, असे साहित्य सीलबंद करून देण्यात आले. इंदापूर शहरातील शासकीय गोडावूनमध्ये एकूण 329 मतदान केंद्रासाठी हे साहित्य देण्यात आले.

यावेळी अमोल भोज, संजय चौगुले, दत्तात्रय गावडे, विकास जाधव, विजय आतर यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्र प्रमुख, तीन मतदान अधिकारी, एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी असा एकूण सहा कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.