इंदापूर तालुक्‍यात एक गाडी अन्‌ कार्यकर्ते “अनाडी’

शरद पवार यांच्या दुष्काळी दौऱ्यानंतर पारायणे : पाटील- भरणेंचा एकत्रित सहभाग चर्चेत

निमसाखर – इंदापूर तालुक्‍यातील शरद पवार यांचा दुष्काळी दौरा चर्चेत राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी- कॉंग्रेस यांच्यातील आघाडी धर्माची साक्ष घेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांचा शरद पवार यांच्यासमवेत झालेला दुष्काळी इंदापूर तालुक्‍यात चर्चेचा ठरत आहे. पाच वर्षांपासून पाटील आणि भरणे यांच्यातील कडवी लढत आणि आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी गेल्या तीन महिन्यांपासून म्यान झाले आहेत. त्यातच दुष्काळी दौऱ्यातून शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित येण्यासाठी साद घातली आहे. त्यामुळे भरणे आणि पाटील गटातील कार्यकर्त्यांची गोची झाल्याशिवाय राहिली नाही. दौऱ्यावरून एक गाडी अन्‌ कार्यकर्ते अनाडी, अशी चर्चा इंदापूर तालुक्‍यात सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांनी आघाडी धर्माची पताका खांद्यावर घेत सुळे यांचा प्रचार करीत मताधिक्‍य दिले. यात आमदार भरणे यांनी प्रचारात आघाडी घेतली. त्यातून दोघांची गोळीबेरीज ही 70 हजारांवर जाऊन पोहचली.

शरद पवार यांनी निर्णायक क्षणी पाटील यांचे मनपरिवर्तन करून कॉंग्रेसचे धनुष्य हाती घ्यावयास लावले. त्यामुळे इंदापूर तालुक्‍याने निकालाचे चित्र पालटवून टाकले. निकाल जाहीर झाल्यानंतर रविवारी शरद पवार यांचा इंदापूर दुष्काळी दौरा होता. यावेळी माजी मंत्री पाटील आणि आमदार भरणे यांनी पवार यांच्या गाडीतून दुष्काळी गावांचा दौरा केला. या दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एक गाडी अन्‌ कार्यकर्ते अनाडी, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकऱ्यांतून उमटत आहे.

ऑगस्टपूर्वी उमेदवारीचे चित्र स्पष्ट
विधानसभा निवडणुकीत इंदापुरच्या जागेचा तिढा सुटणार असल्याचे चित्र समजते. ऑक्‍टोबरपर्यंत आचारसंहिता लागू होईल, असे चित्र आहे. त्यात दुष्काळी दौऱ्यानंतर शरद पवार यांनी आम्ही एकत्र आलो आहे. तुम्ही एकत्र या, असा कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातून राजकीय हवा कोणत्या दिशेने जात आहे. याचा अंदाज आता भरणे आणि पाटील यांच्या कार्यकर्त्यांना येत आहे. यावरून दोन्ही गटातील कार्यकर्ते विधानसभेबाबत ठाम असल्याची चर्चा इंदापूर तालुक्‍यात सुरू आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)