इंदापूर तालुका राष्ट्रवादीत फुट?

रेडा- मराठा, मुस्लिम, धनगर व लिंगायत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची विषेश बैठक आज (रविवारी) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरक्षणाला एकमताने पाठिंबा देण्यात आला. मात्र, त्यानंतर तालुका अध्यक्षबदलावरून कही पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका मांडल्याने बैठकीत गोंधळ उडाला त्यामुळे इंदापूर तालुका राष्ट्रवादीत फुट पडल्याची तर अनेकांनी बैठकीत शक्‍तीप्रदर्शन करीत “लॉबिंग’ केल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत इंदापूर तालुका अध्यक्ष महारूद्र पाटील, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, बाजार समितीचे संचालक सचिन देवकर, अनिल बागल, भाऊसाहेब सपकळ, युवक तालुकाध्यक्ष सचिन सपकळ, विद्यार्थी तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, वालचंदनगर शहर अध्यक्ष तुषार घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, सुभाष जगताप, हनुमंत कोकाटे पाटील, संजय देवकर, वसंत जगताप, किसन जावळे, दत्तात्रय मोरे, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र गोलांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष निवडीवरून कोणताही वाद होता कामा नये. एकतर कधीही पदाधिकारी निवडीत हस्तक्षेप करीत नाही; परंतु या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी ज्या भावना व्यक्‍त केल्या, त्या भावना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू; परंतु शुल्लक गोष्टींसाठी कार्यकर्यांनी ताणू नये, संयम राखावा अशा सूचना त्यांनी केल्या.
अमोल भिसे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा संबध नसणाऱ्यांना पदे देण्याचा घाट घातला जात आहे. तालुकाध्यक्ष म्हणून महारूद्र पाटील यांनी चांगले काम केले असताना व पूर्ण कालावधीचा कार्यकाल संपला नसताना, महारूद्र पाटील यांना का बदलायचे, कुणाच्या सांगण्यावरून बदलायचे? जर चांगल्या पदाधिकाऱ्यांना बदलणार असल, तर आम्ही गप्प बसणार नाही. राष्ट्रवादीचा संदर्भ व संबध नसणाऱ्यांना पदे देणार का असा सवाल अमोल भिसे यांनी करीत आम्ही कट्टर निष्ठावान राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते आहोत,तालुका अध्यक्ष बदलाल तर वेगळा निर्णय घेऊ असाही इशारा कार्याध्यक्ष अमोल भिसे यांनी दिला.

  • आम्ही इमानानेच जगणार
    इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून जेव्हापासून जबाबदारी पडली आहे, त्या क्षणापासून पक्ष संघटना वाढविण्यासाठी चोख काम करतो आहे. उगीच एखाद्याच्या हट्टासाठी मला बदलण्यासाठी हालचाली सुरू आहेत; परंतु जर असे काही झाल्यास राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली फक्त पवार कुटुंबासाठी काम करेन. तसेच इंदापूर तालुक्‍यात जो आम्हाला मान सन्मान देईल, त्याचे काम इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस निष्ठावान विकास आघाडीच्या माध्यमातून करेन.
    – महारुद्र पाटील, इंदापूर तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)