इंदापूरच्या आमदारांचा राजीनामा निव्वळ “स्टंट’

रेडा- राज्यातील आमदारांनी राजीनामे देऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे ही स्वागतार्ह बाब आहे; परंतु इंदापूर तालुक्‍यातील आमदारांनी सभापतींच्या नावे नुसता अर्ज देऊन राजीनामा “स्टंट’ केला आहे. त्यामुळे जनतेला भूलवून थेट सत्कार घेण्याची हिंमत कशी होते, अर्ज म्हणजे राजीनामा नव्हे, अशी टीका राज्याचे माजी सहकरमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली आहे.
इंदापूर येथील तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हर्षवर्धान पाटील यांनी पाठिंबा तर दिला शिवाय आज (शनिवारी) थेट आंदोलनातही सहभाग घेतला, त्यावेळी पत्रकारांची ते बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, नुसत्या गावतल्या सरपंचपदाचा राजीनामा द्यायचा असेल तर, तो विहित नमुन्यातील असावा लागतो, तरच तो मंजूर होतो हा नियम आहे; परंतु इंदापूर तालुक्‍यात जनतेला भूलवून टाकण्यासाठी नुसते “स्टंट’ तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींचे सुरू केलेले आहेत. राजीनामा व अर्ज यात मोठा फरक आहे, हे तालुक्‍यातील जनतेला माहिती आहे, तरी देखील अर्धा हळकुंडाने पिवळे झालेसारखे आव आणित राजीनामा दिला म्हणून काहि लोकांनकडून हार तुरे सत्कार स्विकारतात ही गोष्ट विचित्र आहे. ज्यांनी मराठा, धनगर व मुस्लिम समाजातील बांधवांना आरक्षण द्यावे या मागणीसाठी पाठिंबा दिला त्यांचे जाहीर स्वागत आहे; परंतु असे चुकीच्या पद्धतीने “स्टंट’ इंदापूर तालुक्‍यात नकोत. तुम्हाला जर या समाजाबद्दल कळवळा आहे, तर सभागृहात आवाज का उठवत नाही याचा खुलासा करावा, असेही आव्हान हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे.

  • आणखी किती बळी घेणार?
    कोणत्याही राजकीय पक्षाचा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विरोध नसताना, कोणत्याही आमदारांचा तसेच जनतेचा व सामाजिक संघटनांचा विरोध नसताना, भाजप शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्याचा निर्णय घेत नाही. लोकांनी आरक्षण मिळण्यासाठी राज्यभर आंदोलने सुरू ठेवले आहेत, तर काही जनांणी जीव दिला आहे, असे किती बळी गेल्यावर सरकार जाग येईल? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)