इंदापुरात यंदा केवळ 11 इंच पाऊस

रेडा- गेल्या वर्षी इंदापूर तालुक्‍यात 28 इंच पाऊस झाला होता मात्र, यंदा फक्‍त 11 इंच पाऊस पडल्यामुळे उभ्या उसाला फटका बसला आहे. त्यामुळे “हूमणी’ने थैमान घातले गेले आहे. म्हणून मिळाणाऱ्या उत्पन्नातून 35 टक्के उत्पादन घटणार आहे. दोन्ही कारखान्याकडे 55 हजार एकर उसाची नोंद असली, तरी देखील हूमणीमुळे उत्पन्न घटेल, अशी चिंता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली.
शहाजीनगर येथील नीरा-भीमा व बिजवडी (ता इंदापूर) तील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना पुरुस्कृत ऊस उत्पादकता आणि साखर उतारा वाढिसाठी पारितोषिक योजना अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन शिबिरात हर्षवर्धन पाटील बोलत होते. याप्रसंगी मांजरी (पुणे) येथील कृषी शास्त्र संचालक व तंत्रज्ञान वसंतदादा शुगर इंन्सिट्युटचे विकास देशमुख, नीरा-भीमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, संचालक उदयसिंह पाटील, विकास पाटील, विलास वाघमोडे, रमेश जाधव तसेच दोन्ही ही कारखान्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवधन पाटील म्हणाले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून साखर उतारा वाढिसाठी योग्य उपक्रम सुरू असल्याने व पोत्साहनात्मक पारितोषिक योजना सुरू केल्याने याचा फायदा नीरा-भीमा व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात उतारा वाढवण्यासाठी होईल. तसेच नविन तंत्रज्ञान पद्धतीने शेती करून नविन प्रयोग यशस्वी करत कारखान्याची रिकव्हरी वाढवून होणाऱ्या पारितोषिक योजनेत वरचा क्रमांक मिळवा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक धीरजकुमार माने तर उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)