इंडोनेशियातल्या अवैध तेल विहिरीला लागलेल्या आगीत 18 ठार अनेक जखमी

जाकार्ता (इंडोनेशिया) – एका अवैध तेल विहिरीला लागलेल्या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक डझन लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढ़ण्याची शक्‍यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आग लागलेल्या तेल विहिरीतून 70 मीटर्सपेक्षा अधिक उंचीच्या ज्वाला उसळत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या आगीत अनेक घरे जळून खाक झाली आहेत. सुमात्रा बेटातील ऍकेह प्रांतात रात्री 1.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दले आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप आग नियंत्रणात आली नसल्याचे अग्निशमन दलाचे सियारीझल फौजी यांनी सांगितले आहे.

एक जुनी विहीर खणून अधिक खोल करण्याचा प्रयत्न काही लोक करत असताना अचानक स्फोट झाला आणि विहिरीतून ज्वाळा उसळल्या. आग लागली तेव्हा अनेक लोक विहिरीच्या तोंडाशी तेल जमा करण्याचे काम करत होते, असे पोलीस प्रवक्ते सेत्यो वसिस्टा यांनी सांगितले आहे. विहिरीतून किती तेल बाहेर पडत होते वा कशामुळे आग लागली याबाबत काही माहिती नाही असेही सेत्यो वसिस्टा यांनी सांगितले आहे.

इंडोनेशियन द्वीपसमूहात हजारो तेल विहिरी असून पूर्व ऍकेह भागात असंख्य छोट्या छोट्या तेल विहिरी आहेत. बंद करण्यात आलेल्या तेल विहिरी स्थानिक लोक पुन्हा खणतात आणि नवीन विहिरीही खणण्याचा प्रयत्न करतात. इंडोनेशियात सुरक्षा सुविधांची मोठी कमतरता आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात ही नवीन गोष्ट नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)