इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा: नॉर्थईस्टची वाटचालीत दिल्लीचा अडथळा

गुवाहाटी: हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि दिल्ली डायनॅमोज यांच्यात लढत होत आहे. बाद फेरीच्यादृष्टिने नॉर्थईस्टला विजय बहुमोल असेल, पण प्रतिस्पर्ध्याचा अंदाज चुकविण्याची क्षमता असलेला दिल्ली त्यांच्या वाटचालीत अडथळा निर्माण करण्याची शक्‍यता आहे.
नॉर्थईस्ट सध्या बाद फेरीच्या शर्यतीत शेवटच्या चौथ्या क्रमांकावर आहे. 14 सामन्यांतून त्यांनी 23 गुण मिळविले आहेत. आता केवळ चार सामने बाकी आहेत. जमशेदपूर आणि एटीके त्यांचा पाठलाग करीत आहेत. अशावेळी घरच्या मैदानावर कमाल गुण मिळविण्याचा नॉर्थईस्टचा प्रयत्न राहील. गेल्या सात सामन्यांत एल्को शात्तोरी यांच्या नॉर्थईस्टला केवळ दोन विजय मिळविता आले आहेत. आता गुण गमाविल्यास इतिहासात प्रथमच आयएसएलची बाद फेरी गाठण्याची त्यांची मोहिम धोक्‍यात येऊ शकते.

शात्तोरी यांनी सांगितले की, दिल्लीसाठी बाद फेरीला पात्र ठरणे अवघड आहे. ते दडपण न घेता खेळू शकतात. हेच काही करून दाखविण्याचे आव्हान तुमच्यासमोर असेल तर दृष्टिकोन पूर्णपणे वेगला असतो. आम्ही अशा स्थितीत आहोत की आम्हाला विजय गरजेचा आहे. दिल्ली सुद्धा अनुकुल निकाल मिळविण्यासाटी खेळेल. अशा संघाविरुद्ध खेळताना लवकर गोल करू शकलात तर तुम्ही प्रेरणा नसलेल्या संघाला जेरीस आणू शकता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात दिल्लीने मागील सामन्यात एफसी गोवा संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले होते हे शात्तोरी यांच्या लक्षात आहे. त्यामुळे आव्हान बाकी असलेल्या प्रतिस्पर्ध्यासाठी दिल्लीमुळे पुन्हा रंगाचा बेरंग होण्याची शक्‍यता आहे. नेदरल्‌ँसच्या शात्तोरी यांना आपल्या संघाच्या निकालांची काळजी आहे. याचे कारण गेल्या पाच सामन्यांत त्यांना एकच विजय मिळाला आहे. नॉर्थईस्टने 4-3-2-1 अशा स्वरुपाला पसंती दिली. यात प्रारंभी स्टार स्ट्रायकर बार्थोलोम्यू ओगबेचे आघाडीवर असायचा. त्याचवेळी शात्तोरी यांनी 4-4-2 अशा स्वरुपाचा प्रयोगही केला आहे. आता मात्र ते आधीच्या निकाल मिळवून दिलेल्या स्वरुपाकडे पुन्हा वळण्याची अपेक्षाआहे.

दिल्लीला दुसरीकडे अखेरीस फॉर्म मिळाला आहे. गेल्या तीन सामन्यांत नऊ पैकी सात गुणांची कमाई त्यांनी केली आहे. पूर्वार्धात मात्र धक्कादायक खेळ झाल्यामुळे त्यांचे आव्हान आटोपले आहे. अर्थात कोणत्याही संघाला झुंजविण्याची क्षमता असल्याचे दाखवून देण्यासाठी दिल्ली प्रयत्नशील असेल. दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षर म्रृदुल बॅनर्जी यांनी सांगितले की, आम्ही उरलले सामने जिंकले तर संघ प्रेरीत होईल. आम्ही बाद फेरीसाठी कदाचित पात्र ठरू शकणार नाही याची आम्हाला कल्पना आहे, पण पुढील सामना जिंकला तर आमचा आत्मविश्वास उंचावेल. घरच्या मैदानावर आम्ही नॉर्थईस्टविरुद्ध 0-2 असे हरले. आता आम्ही जिंकलो तर संघाचा आत्मविश्वास उंचावेल. दिल्लीसमोर काही खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे मात्र प्रश्नचिन्ह आहे. मध्यरक्षक बिक्रमजीत सिंगला दुकापत झाली आहे, तर ऍड्रीया कॅर्मोना संघाबरोबर असला तरी खेळण्याची शक्‍यता नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)