इंडियन सुपर लिगचा पाचवा हंगाम 29 सप्टेंबर पासून 

Bengaluru: Chennaiyin FC team members celebrates after winning against Bengaluru FC during the ISL final match at Kanteerava Stadium in Bengaluru on Saturday. . PTI Photo by Shailendra Bhojak(PTI3_17_2018_000161B)

मुंबई – इंडियन सुपर फुटबॉल लीगच्या ( खडङ) पाचव्या हंगामाला 29 सप्टेंबरपासून कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवरून सुरुवात होणार आहे. आयएसएलचा चषक दोनवेळा उंचावणाऱ्या ऍटलेटिको दी कोलकाता आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यात उद्घाटनीय सामना खेळवण्यात येणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी लीगचा पहिला सामना कोलकाता आणि केरळ यांच्यात होणार आहे.

गतउपविजेत्या बेंगळूरु एफसी आणि गतविजेत्या चेन्नईयन एफसी यांच्यात दुसरा सामना 30 सप्टेंबरला बेंगळूरुत खेळवला जाईल. 2017-18 च्या अंतिम सामन्याची ही पुनर्लढत असेल. त्यापाठोपाठ नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि एफसी गोवा, तर मुंबई एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात लढती होतील.
आता केवळ 59 लढतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2018-19 हे हंगाम तीन टप्प्यांत पार पडणार आहे. फिफा विंडोमुळे 8 ते 16 ऑक्‍टोबर व 12 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत चे सामने होणार नाही. 2019 मध्ये युएईत होणाऱ्या आशियाई चषक स्पर्धेच्या तयारीसाठी 17 डिसेंबरपासून  लढती होणार नाहीत. त्याशिवाय आगामी हंगामात दिवसाला दोन सामने नसतील आणि प्रत्येक सामना सायंकाळी 7:30 वाजल्यापासून खेळविण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)