इंजक्‍शनची एकच सुई वापरल्याने मध्य प्रदेशात 1 ठार 25 अत्यवस्थ

नवी दिल्ली – इंजक्‍शन दिल्यांनंतर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आणि 25 अन्य रुग्णांची अवस्था गंभीर झाल्याने हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ माजला. इंजक्‍शन देणाऱ्या नर्सने इंजक्‍शनची एकच सुई सर्वांसाठी वापरल्याने हा प्रकार घडल्याचे समजते.

मध्य प्रदेशातील दातिया जिल्हा हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची तक्रार पोलीसांना मिळाली असून त्याबाबत तपास चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. जिल्हा उपाध्यक्ष सरनाम सिंग राजपूत यांचा चुलत भाऊ, 52 वर्षीय इमतात सिंग हा इंजक्‍शन दिल्यानंतर 5 ते 7 मिनिटात मरण पावल्याची माहिती देण्यात आली आहे. इंजक्‍शन देणाऱ्या नर्सच्या हलगर्जीपणामुऴे हा प्रकार घडला आहे. या बाबतीत मेडिकल बोर्डाचा अहवाल यायचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नर्सने सर्व रुग्णांना इंजक्‍शन्स देण्यासाठी एकच सुई वापरली आणि डिस्टिल्ड्‌ वॉटर ऐवजी साधे पाणी वापरले. हा सारा नर्सच्या हलगर्जीपणाचा परिंणाम असल्याचे हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ. के पी शर्मा यांनी सांगितले. मात्र इंजक्‍शन्स देण्यासाठी वापरण्यात आलेली इंजक्‍शनची सुई ही कालबाह्य झालेली (एक्‍स्पायरी डेट होऊन गेलेली) नव्हती असे स्पष्टीकरण हॉस्पिटलने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)