आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी भरले साताऱ्यातील खड्डे

सत्ताधारी गटाला गांधीगिरीने विरोध:शहरात चर्चा
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) –
सातारा नगरपालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी गटाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गांधीगिरीने विरोध केला. भूविकास बॅंक ते आरटीओ चौक या रस्त्यातील खड्डे त्यांनी स्वखर्चाने भरले. खासदार गटाला दिलेल्या राजकीय शहाची राजकीय व वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय दौलत नगर भागातील अंर्तगत रस्त्यातील खड्डे बुजवण्याची तयारी त्यांनी दर्शवली असतानाही सातारा शहर खड्ड्यात गेले असल्याने आज आमदार शिवेंद्रराजे सकाळी साडेआठ वाजताच आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. रोलर टीपर कामगार यांच्यासह खोरी फावड्यांचा जुना आरटीओ चौक मार्गावर खणखणाट सुरू झाल्याने राजकीय आश्‍चर्य सुरू झाले. हुतात्मा चौक ते जुना आरटीओ चौक या सव्वाशे मीटरच्या रस्त्यातील तब्बल चाळीस खड्डे मुरुमाने भरले. रोलरने त्या रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. आमदारांची ही श्रमदान मोहीम दोन तास सुरू होती. स्वतः आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी या मोहिमेत भाग घेतला. या रस्त्यासाठी डीपीडीसीतून निधी मिळावा यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे निधी मागण्यात आला होता. मात्र राजकीय श्रेय मिळणार नाही यासाठी सातारा पालिकेने प्रस्ताव दिला नाही. नुसता टीपर चालवून साताऱ्याचा विकास होत नाही. पण सातारा पालिका केवळ साशा कंपनीची बिले आणि त्याचे कमिशन यामध्ये मशगूल आहे. खासदारांचे लक्ष विकास कामांकडे नाही तर केवळ आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये आहे अशी घणाघाती टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.

पालिकेच्या नावाने शंख
सातारा शहरात पावसामूळे रस्त्याची चाळण झाली आहे. सातारकरांना गेल्या अनेक महिन्यापासून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे सातारकरांनी आपली खदखद नेमकी कुठं व्यक्त करायची हा प्रश्न निर्माण झाला होता. याची नस पकडत शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वखर्चातुनच सातारा शहर परिसरातील खड्डे मुजवण्याची मोहीम काढली आणि स्वतः खोरे घमेले घेऊन खड्डे मुजवण्यास सुरवात केली. या मोहिमेचे नागरिकांनी स्वागत केले आणि पालिकेच्या नावाने शंख केला.या सर्व प्रकारामुळे सातारा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाला एक चपराक बसल्याचे असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या स्टंटमुळे राजेशाही भाऊबंदकीतला टोकाचा आंतरविरोध या निमित्ताने स्पष्ट झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)