आ.राधाकृष्ण विखे यांनी दिला आंदोलनाचा इशारा

नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था

 नगर -नगर-मनमाड या मार्गाची आवस्था अतिशय भीषण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांतील खड्डयांकडे जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामळे अपघातांतचे प्रमाण वाढले आहे. वाहतुकीच्या दृष्टिने अडचणीच्या झालेल्या रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आ.राधाकृष्ण विखे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

यासंदर्भात आ.विखे यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना या मार्गाच्या परिस्थितीचे फोटो आणि व्हीडीओची सीडी पत्रासोबत पाठवून या रस्त्याच्या दुरावस्थेकडे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे.

आ.विखे यांनी सांगितले की, नगर- मनमाड हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहतूक या मार्गावर सुरू असते. परंतू नुकत्याच झालेल्या पावसाने या मार्गावर सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून, या खड्डयांकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी जाणीपूर्वक दुर्लक्ष केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले.

Leave A Reply

Your email address will not be published.