आ.जगतापांनी घेतली रहाटकर यांची भेट

माजी खा. गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधान

नगर – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेतली. त्यामुळे शहरात पुन्हा चर्चेला उधान आले आहे. आ. जगताप हे सेना-भाजप मध्ये जात आहेत का? असा प्रश्‍न नगरकरांना पडला आहे.

बुधवार (दि.17) रोजी आमदार जगताप यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले होतीकी, शिवसेनेत अंतर्गत कुरघोड्या सुरु झाल्या असून, कार्यकर्त्यामध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे माझ्यानावाची भिती घालून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात येत आहे. तो पक्ष विखुरला आहे. त्याच्या एकजूटीसाठी माझ्या नावाचा वापर केला जात असल्याचे सांगितले होते.

मात्र, संध्याकाळी आ. जगताप हे भाजपचे माजी खासदार यांच्या बंगल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेतली. गेल्या दोन-चार दिवसापूर्वी सोशल मिडियावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी ठाणे येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट घेऊन चर्चा केली. आता रहाटकर यांची भेट घेवून पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.