आहार विधी (भाग तीन)

द्राक्षा फलोत्तमा।

अर्थात फळांमध्ये द्राक्षे ही सर्वांत चांगली. इथे काळी द्राक्षे ही अपेक्षित आहेत आणि तीसुद्धा सबीज म्हणजे बिया असलेली. पण ती माणसाने “उपेक्षित’ केली आहेत. खाताना मधेमधे बियांचा त्रास नको म्हणून सीडलेस करून टाकली आहेत. त्यावर प्रचंड प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे पुष्कळदा यांचा उपाय न होता अपायच जास्त होते.काही चुकीच्या प्रसारामुळे “जेवणानंतर’ फळे खाण्याचा प्रघात सध्या अतिशय प्रचलित आहे.

आयुर्वेदानुसार फळे ही रिकाम्यापोटी म्हणजे जेवणाच्या आधी किंवा एक डिश म्हणून घेणे हे योग्य आहे; परंतु व्यवहारात आपण बघतो की फळे ही नेहमी जेवणानंतर घेतली जातात. आपण आधीच पाहिले की, फळे ही मधुररसाची, त्यामुळे पचायला जड असतात. जेवण झाल्यानंतर अर्थातच भूक कमी होते आणि त्यावेळी अशी पचायला जड असलेली फळे घेण्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी आलटून पालटून फळे खाणे हे जास्त फायद्याचे होते.

काही पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसतात. त्यांना विरुद्ध अन्न असे म्हटले जाते. मासे खाणाऱ्या लोकांना माहीत आहे की, दूध आणि मासे एकत्र खाऊ नये. व्यवहारात आपण पाहतो की गूळ आणि ताक, दही हे पदार्थही एकत्र खाऊ नये असे माहीत असते कारण त्याचे नेहमी सेवन केले गेले तर त्याचे वाईट परिणाम शरीरातील धातू इ. घटकांवर होतात.

अशा विरुद्ध अन्नामध्ये दूध आणि फळं एकत्र खाण्याचा क्रमांक खूप वरचा आहे. आणि सध्या तर “कशातही काहीही’ एकत्र करून खायची चुकीची प्रथा झाली आहे. अशा अनेक पदार्थांची मोठी यादीच्या यादी देता येईल. की जी चुकीच्या पद्धतीने आता तयार केली जातात. उदा. मॅंगो लस्सी, फळांबरोबरच्या इतर लस्सी इत्यादी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)