आस्करवाडी येथील तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

सासवड- आस्करवाडी (ता. पुरंदर) येथील तलावात बुडून सोहेल रियाज शेख (वय 22, रा. कोंढवा, पुणे) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत सादिक इलाही शेख यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

बुधवारी (दि. 27) दुपारी सोहेल शेख हे त्यांचे मित्र अब्दुल रसिद नदाफ तसेच आफसिना फिरोज सय्यद, मुस्कान घरातील गोधड्या आणि कपडे तलावातील पाण्यात धुण्यासाठी आस्करवाडी येथे आले होते. सर्व कपडे धुऊन झाल्यानंतर सोहेल पोहण्यासाठी तलावातील पाण्यात उतरला; परंतु तलावातील गाळाचा अंदाज न आल्याने तो गाळात अडकला.

स्वतःला वाचविण्यासाठी त्याने आरडाओरडा सुरू केला. त्याचा आवाज ऐकून काठावर असलेल्या मित्रांनी त्याचा शोधाशोध सुरू केली; परंतु तलावातील गढूळ पाणी आणि गाळ यामुळे तो दिसून आला नाही.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. 28) पुणे येथील एनडीआरएफ, मुळशी येथील आपत्ती निवारण समितीचे पथक आणि पुणे येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.सलग आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सोहेलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.