आसाराम निकालाच्या पार्श्‍वभूमीवर जयपुर मध्ये निर्बंध

जोधपुर – बलात्काराचा आरोप असलेले अध्यात्मिक गुरू आसाराम यांच्यावरील खटल्याचा निकाल येत्या 25 एप्रिलला दिला जाणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आज पासून येथे 30 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. जोधपुरच्या मध्यवर्ती कार्यालयात आसाराम यांच्यावरील निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे.

निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची सुचना उच्च न्यायालाने पोलिसांना दिली आहे. आसाराम यांच्या शिष्यांना निकालाच्या दिवशी शहरात येण्यास पोलिस बंदीही घालू शकतात असे वरीष्ठ पोलिस अधिकारी दीपसिंग यांनी सांगितले. निकाल विपरीत गेला तर आसाराम यांचे शिष्य शहरात कायदा आणि सुव्यवस्था स्थितीची अडचण निर्माण करू शकतात असे संकेत मिळाल्याने ही उपाययोजना केली जात आहे.

त्याखेरीज पोलिसांनी आसाराम यांच्या पलगाव आणि मनाई या गावांतील आश्रमांवरही पाळत ठेवली असून वरील कालावधीत आश्रमांत लोकांची गर्दी जमवू नये अशी सुचना या आश्रमांच्या व्यवस्थापकांना देण्यात आली आहे. जोधपुर मधील हॉटेल्स आणि बस तसेच रेल्वे स्थानकांवरही पोलिसांचे बारीक लक्ष राहणार आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)