आसारामचे तुरुंगातून मोबाइलवरून भक्तांना लाईव्ह प्रवचन

पाटणा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम  धक्कादायक माहिती समोर आली आहे. आसाराम तुरुंगातून मोबाइलवरून लाईव्ह प्रवचन देत असल्याचं वृत्त एका हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. भक्तांना मोबाइलवरून प्रवचन देत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे. आसारामला शिक्षा सुनावल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे.

आसारामची ही ऑडिओ क्लिप त्यांचे फेसबुक पेज आणि मोबाइल अॅप ‘मंगलमय’वर शेअर केली गेली आहे. पण यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून ती क्लिप डिलीट करण्यात आली. ‘मी लवकरच तुरुंगातून बाहेर येईल. वरिष्ठ कोर्ट माझ्या शिक्षेला रद्द करेल, मला अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. मी आधी मुलगी शिल्पीला बाहेर काढीन नंतर शरदचंद्रला बाहेर काढीन त्यानंतर मी स्वतः बाहेर येईन, असे त्या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जातो आहे.

आसारामचे हे ऑडिओ प्रवचन समोर आल्यानंतर तुरुंगातही खळबळ उडाली. जोधपूर तुरूंगाचे अधिकारी विक्रम सिंह यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडे सहा वाजता आसारामचे कैदी अधिकाराचा वापर करत साबरमती आश्रमात फोनवरून बोलणे झाले होते. तुरुंगात असताना कैद्यांना 120 रुपये जमा करून 80 मिनिटे फोनवर बोलण्याचा अधिकार मिळतो. आसाराम फोनवर बोलताना कुठल्याही आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या नव्हता ज्यामुळे तुरुंग प्रशासना त्याच्यावर कारवाई करेल. साबरमती आश्रमात आसारामने फोन केल्यावर त्याचे बोलणे कुणीतरी रेकॉर्ड केले असावे. व तो कॉल प्रसारीत केला असावा,असे ते म्हणाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)