आशिया-युरोपियन युनियन संसदीय बैठकीस खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड

कोल्हापूर – राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दहाव्या आशिया-युरोपियन युनियन संसदीय बैठकीस (एएसइपी-10) उपस्थित राहण्यासाठी जाणा-या शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही बैठक बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे दि. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

भारतातर्फे तीन खासदारांचा समूह सहभागी होणार असून यामध्ये राज्यसभा सदस्य खासदार संभाजीराजे छत्रपती, लोकसभा खासदार अजयकुमार मिश्रा व उदितराज यांचा समावेश आहे. या बैठकीमध्ये युरोपियन युनियनचे 28 देश सहभागी होत असून अशियामधील 48 देश सहभागी होणार आहेत. युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्र नसलेले परंतु महत्वपूर्ण असे ऑस्ट्रेलिया, न्युझलंड आणि रशिया हे देश देखिल सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संसदीय बैठकीत हवामान बदलामुळे जगभरात आलेली नैसर्गिक संकटे, आरोग्याच्या समस्या, निरक्षरता, गरिबी अशा अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे. हवामान बदलाचा परिणाम प्रत्येक देशावर वेगवेगळा आहे. हवामान बदल आणि मानवी जीवनाशी निगडीत विविध क्षेत्रांवर त्याचा होणारा परिणाम ही एएसइपी-10 ची मध्यवर्ती संकल्पना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)