आशिया चषक 2018 : बांगलादेशचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

अबूधाबी – पाकिस्तानला ३७ धावांनी पराभूत करत बांगलादेशने इतिहासात तिसऱ्यांदा आशिया फेरीत धडक मारली आहे. यामुळे आता उद्या (२८ सप्टेंबर) आशिया कपसाठी भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम डावात बांगलादेशची सुरुवात खराब झाली. केवळ १२ धावातच बांगलादेशचे ३ गडी तंबूत परतले. परंतु, मुश्‍फिकुर रहीम आणि मोहम्मद मिथुन यांची शानदार अर्धशतके आणि त्यांनी केलेल्या झुंजार भागीदारीने १४४ धावसंख्या उभारली. मुश्‍फिकुरने 116 चेंडूंत 9 चौकारांसह 99 धावांची खेळी केली. व पाकिस्तानसमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान ठेवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाचीही सुरुवात वाईट झाली. १८ धावात पाकिस्तानने ३ गडी गमावले. सलामीवीर इमाम उल हक (८३) याच्याशिवाय कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानी संघ जास्त वेळ तग धरून ठेवता आला नाही. अखेर ३७ धावांनी पाकिस्तानचा बांगलादेशने पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)