आशिया चषक कोण पटकाविणार ?

अबुधाबी: जापान आणि कतार या दोन संघात आशिया चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. भक्कम बचावाच्या जोरावर कतारने प्रथमच अंतिम सामान्यांपर्यंत मजल मारली आहे त जपानचा संघ मागील 11 सामान्यांपासून अपराजित आहे. हा अंतिम सामना 1 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. कतारने यजमान संघ संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केल्याने येथील प्रेक्षकांचा जपानला पाठिंबा मिळत आहे.

विजयाचे दावेदार असणाऱ्या इराणला 3-0 असे नमवत जपानने अंतिमफेरी गाठली असली तरी याचे कतारचा संघ दडपण घेत नाही. संपूर्ण देशाने पाहिलेले स्वप्न पूर्ण कारण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार असल्याचे कतारचा आक्रमकपटू अलमोईज अलीने म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत 8 गोल करत अली दाईच्या विक्रमी कामगिरीशी बरोबरी साधली आहे.
मोठ्या स्पर्धा या संयमाने जिंकल्या जातात. त्यामुळे जपानच्या संघाने जर संयमाने खेळ केला तर स्पर्धा जिकंण्याच्या संधी आणखी वाढतील असे मत जपानच्या संघ व्यवस्थापनाकडून मांडण्यात आले आहे. फुटबॉल विश्वचषकानंतर झालेल्या 11 सामन्यात जपानाने पराभव स्वीकारलेला नाही. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाल्यावर कधीही स्पर्धा गमावलेली नाही. त्यामुळे इतिहास जपानच्या बाजूने आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×