आवळा व चिंचेच्या रोपांचे वाटप

गराडे- कानिफनाथ माध्यमिक विद्यालय भिवरी (ता. पुरंदर) येथील सन 1998-99 सालच्या माजी विद्यार्थी व इलिका पी. बी. इंडीया प्रा. लि. पिसोळी यांच्या संयुक्त विद्यमाने 500 आवळा व चिंचेच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी दादासाहेब घाटे, पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय काळे, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शांताराम कटके, संचालक गुलाब घिसरे, भाऊसाहेब कटके, भाऊसाहेब दळवी, भिकाजी कटके, जगन्नाथ कटके, ग्रामविकास अधिकारी अविनाश निगडे समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतापर्यंत 600 केशर आंब्यांची, 626 जांभूळाच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक बारिक खेसे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण गायकवाड, मनोहर कामठे यांनी केले. तर एच. टी. कामठे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)