आळेफाटा येथे आगीत डाळिंबांचे बॉक्‍स भस्म

व्यापाऱ्याचे दोन लाखांचे नुकसान

शिवनेरी – कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या आळेफाटा येथील उपबाजाराच्या गाळ्यांसमोर असलेल्या दुकानांना बुधवारी (दि. 10) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत एका दुकानामधील विक्रीसाठी ठेवलेले डाळिंबांचे बॉक्‍स जळून खाक झाले असून, यामध्ये व्यापाऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आळेफाटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार केंद्र असून, या उपबाजार केंद्राच्या समोरच सुभाष लोढा यांचे डाळिंब पॅकिंग करण्याच्या साहित्याचे दुकान आहे. या दुकानाला बुधवारी (दि. 10) सकाळी दहाच्या सुमरास आग लागली, त्यामध्ये सुभाष लोढा यांच्या दुकानातील डाळिंब पॅकिंग करण्याचे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन टॅंकर बोलविण्यात आले होते. या टॅंकरच्या सहाय्याने ही आग आटोक्‍यात आली. या आगीमध्ये सुभाष लोढा यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहेण दुकानात कागदी साहित्य असल्यामुळे ही आग अधिक भडकली. या आगीची झळ त्यांच्या शेजारी असलेल्या महेंद्र नरवडे यांच्या हॉटेललाही बसली. त्यामध्ये त्यांचे पाणी साठविण्यासाठी ठेवलेले दोन प्लॅस्टिकचे बॅरल आणि शितपेयांचे कॅरेट जळून खाक झाले. आग वेळीच आटोक्‍यात आल्यामुळे महेंद्र नरवडे यांचे किरकोळ नुकसान झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.