आळंदी नगरपरिषदेच्या शाळेत उंदरांचा सुळसुळाट

आळंदी- खिडक्‍यांच्या काचांना ठिकठिकाणी तडे गेलेले… अनेक ठिकाणी खिडक्‍यांना काचाच नाही… इमारतीच्या भिंतीमध्ये व स्ज्जावर झाडे उगवलेली… इमारतीत उंदारांचा सुळसुळट… स्वच्छातागृहे असोन नसल्या सारखी…. स्वच्छतेचा अभाव… तुटकी बाकी… सर्वत्र धुळ व जाळे जळमाटे पसलेले… याच अवस्थेत विद्यार्थी अध्यापन घेत आहे… अशी अवस्था आहे आळंदी नगरपरिषेच्या शाळा क्रमांक दोनची.
आळंदी नगरपरिषदेच्या आळंदी शहरात एकूण चार शाळा आहेत. पैकी चावडी चौकात असणारी शाळा क्र.2 ही गावठाणात व भरवस्मतीध्ये असून तीन मजली पक्‍या बांधकामाची शालेय इमारत आहे. मात्र तिच्या मागील बाजुच्या सर्व मजल्यांवरील खिडक्‍यांच्या काचा ठिकठिकाणी तडे जाऊन फुटलेल्या अवस्थेत आहेत तरसे तिच्या भिंतीमध्ये व सज्जावर पिंपळाच्या पानांची (झाडांची), गवत उगवले आहे. शाळेच्या प्रथम दर्शनीचा भाग मात्र स्वच्छतेचा संदेश देत सुस्थितीत ठेवण्यात आला आहे; परंतु मागे गेल्यास ही भिषणता दिसून येत असून अशाही परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, शाळेच्या ओट्यावर रात्रंदिवस भिकारी व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा वावर दिसुन येतो. त्यात आणखी भर म्हणून आळंदीचे नगर भू मापन कार्यालय याच इमारतीत मध्यभागी आहे. त्यामुळे या कार्यालयासह संपूर्ण शाळेच्या इमारतीत उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे.तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनीसाठी असलेली स्वच्छता गृहे असून नसल्यासारखी आहेत. पिण्याच्या पाण्याची तर वानवा असल्याने विद्यार्थ्यांन लघूशंकेसाठी उघड्यावर जावे लागते विद्यार्थिनींनीची मोठी कुंचबणा होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तरी आळंदी नगरपालिका प्रशासनासह वरिष्ठ शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून येथील चारही शाळांमधील झालेल्या दुरवस्थेतेची सुधारणा करून शालेय विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण शिक्षण देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  •  सहा वर्षांपासून एकच प्रशासक
    आळंदी नगरपरिषदेच्या चारही शाळांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी सहा वर्षांपूर्वी प्रशासनधिकारी म्हणून … जाधव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांचे चारही शाळांकडे व शालेय कामकाजावर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी मुख्याध्यापक महादेव कुऱ्हाडे (गुरूजी) यांनी केला आहे. ते म्हणाले की जाधव या आजवर वेळेवर एकदिवस देखील आल्या नाहीत. तसेच दर तीन वर्षांनी होणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीतून जाधव यांना शासनाने वगळले की काय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
  • आम्ही वेळोवेळी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित शिक्षण विभास कळविले आहे. शाळा दुरूस्तीसाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांतच सर्व कामे मार्गी लागतील.
    – जाधव, प्रशासक
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)