आळंदीत डेंग्यूसदृश्‍य तापाचे रुग्ण

आळंदी- आळंदीत वाढती अस्वच्छता आणि नदी पात्रातील जलपर्णीमुळे डासांची वाढल्याने डेंग्यूसदृश तापाची लागण झाली आहे. शहरात गोपाळपूरा भागातील एकाच कुटूंबातील पाच जण डेंग्यूसदृश तापाने खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
आळंदीत सध्या ठिकठिकाणी उघडी गटारांतील तुंबलेले सांडपाण्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. ठेकेदार कचरा वेळेत उचलत नाही. तर रस्त्यावर जंतुनाशक पावडरची फवारणीही केली जात नाही.धुरळणी यंत्रे यात्रेशिवाय वापरली जात नाही. याशिवाय इंद्रायणीत गोपाळपूराच्या मागील बाजूस जलपर्णी बेसुमार वाढली आहे. तर सिद्दबेट ते जून्या पूलाजवळील स्मशानभूमीपर्यंतच्या परिसरात सांडपाणीयुक्‍त पाण्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. गोपाळपूरा भागात तर नदीपात्रातील अनेक दिवसांपासून जलपर्णी न काढल्याने जलपर्णी दाट झाली आहे. याचा परिणाम गोपाळपूरा भागात डेंगीसदृश तापाने स्त्रस्त रूग्णांची संख्या अधिक आहे. येथील एका कुटूंबातील पाच जणांना डेंग्यूसदृश तापाने आजारी असून आळंदीतील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत कुटूंबप्रमुख ज्ञानेश्‍वर जाधव म्हणाले की, गेल्या दोन आठवड्यापासून गोपाळपूरा भागात इंद्रायणीतील जलपर्णी न काढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पालिकेचा आरोग्य विभाग काहीच काम करत नाही. येथे आमचे कुटूंब राहत असून यामधे सर्वांना डेंग्यूच्या तापाची बाधा झाली आहे. संपूर्ण कुटूंबच आजारी पडले आहे, तरी पालिकेने तत्काळ औषध फवारणी करावी. याशिवाय मरकळ, वडगाव, प्रदक्षिणा रस्त्यावरही हीच अवस्था आहे. भागिरथी नाल्याच्या बाजूलाही अस्वच्छता आहे. यामुळेच डासांच्या संख्येत वाढ झाली आहे.

  • दर आठवड्याला ग्रामीण रुग्णालयाचा आरोग्याबाबतचा अहवाल मागवला जातो. त्यांच्या अहवालात डेंग्यूबाबत कसलाही उल्लेख नाही. तरीपण आगोग्य विभागामार्फत शहरात सर्वेक्षण केले जाईल व त्यानुसार स्वच्छतेबाबत कार्यवाही केली जाईल.
    -समीर भूमकर, मुख्याधिकारी, आळंदी

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)