आळंदीत ट्रकचालकाला मारहाण

पिंपरी – भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला अडवून ट्रकची काच फोडत चालकाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेचारच्या सुमारास आळंदी येथे घडली.राम विठ्ठल पवार (वय 38, रा. हनुमान मंदिराजवळ, त्रिवेणीनगर चौक, निगडी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर लोखंडे, अक्षय लोखंडे (दोघेही रा. मरकळ, ता. खेड) आणि अन्य एक साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार त्यांच्या ट्रकमध्ये स्क्रॅप मटेरियल भरून आळंदी येथील वजन काट्यावर वजन करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी मोटारसायकलवरून येऊन मोटारसायकल ट्रकसमोर उभी केली. त्यामुळे पवार यांनी ट्रक थांबवला. आरोपींनी ट्रकच्या समोरच्या काचेवर सत्तूरने वार करून काच फोडली. त्यानंतर तिघांनी मिळून शिवीगाळ व दमदाटी करून बेदम मारहाण केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)