आळंदीत करभरण्याची मुदत वाढवली

महिना अरेखरपर्यंत भरण्याचे पालिकेचे आवाहन

आळंदी- आळंदी पालिकेची 2018-19 या आर्थिक वर्षाची करवसूली 71 टक्‍के झाली आहे. उर्वरित वसूलीसाठी करभरण्याची मुदत पालिकेने वाढवीली असून एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांनी कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

आळंदी पालिकेने मिळकत कराबाबत दिलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी 3 कोटी 44 लाख 81 हजार रूपये चालू मागणी आणि 1 कोटी 90 लाख 90 हजार रूपये थकबाकीची रकम अशी एकूण 5 कोटी 35 लाख 71 हजार रूपयांची वसूल करण्याचे पालिकेसमोर आव्हान होते. यामध्ये पालिकेने थकबाकीदारांकडून 1 कोटी 34 लाख 82 हजार रूपये वसूल केले. तर चालू मागणी पैकी 2 कोटी 47 लाख 38 हजार रूपयांची वसूली केली. वसुलीसाठी पालिकेच्या करसंकलन विभागाने गेल्या महिन्याभरात नळजोड तोडले. कोणाची मिळकत सील केली होती. यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस पालिकेचा कर भरणा चांगला झाला. उर्वरित करदात्यांनसाठी आता पालिकेने कर भरणा करण्यासाठी या महिन्यच्या अखेरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र, त्यानंतर मिळकत करावर व्याजदर आकारून सक्‍तीची वसूली केली जाणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान 56 लाख 7 हजार रूपये थकबाकी आणि चालू मागणीपैकी 57 लाख 42 हजार रूपये असे एकूण 1 कोटी 53 लाख 49 हजार रूपये वसूल करणे बाकी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.