आळंदीत कचऱ्याचे ढिग

ठेकेदाराचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

आळंदी- राज्यात स्वच्छ सर्वेक्षणांची नामांकने सुरू असतानाच आळंदीत ठेकेदारांच्या दुर्लक्षानेच गेल्या चार दिवसांपासून मरकळ रस्ता, माऊली पार्क, प्रदक्षिणा मार्ग, चाकण चौक, वडगांव घेनंद रस्ता देहुफाटा परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.
गेली दोन वर्षे स्वच्छ सर्वेक्षणाचे धडे गिरवून नागरिकांना भुलथापा देणाऱ्या ठेकेदाराचा ठेका त्वरित काढुन घ्यावा, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते रामदास दाभाडे व कृष्णा डहाके यांनी संयुक्‍तरित्या केली आहे. दरम्यान, आळंदी येथे आरोग्य विभागाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने एकाचवेळी आळंदी व जेजुरी या दोन्ही ठिकाणचा ठेका उचलल्याने एक ना धड, भाराभर चिंध्या अशी अवस्था आळंदीकरांच्या आरोग्याची केली असून, अशा स्वच्छ सर्वेक्षणाचे तीन तेरा वाजवून तीर्थक्षेत्र आळंदीला या स्वच्छ भारत अभियानातून नापास करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका त्वरित काढुन टाकण्यात यावा, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.

  • येत्या जनरल बॉडीच्या मिटिंगमध्ये हा विषय घेऊन तो स्वतंत्रपणे सर्वानुमते ठराव संमत करून या बेफिकीर असणाऱ्या ठेकेदाराचा ठेका त्वरित काढुन टाकण्यात येईल व त्यास काळ्या यादीत टाकण्यात येईल. तसेच आरोग्य विभागाच्या प्रमुख शीतल जाधव यांनाही खडसावले असून यापुढे कामात दिरंगाई होता कामा नये. तसेच प्रत्येक प्रभागात एक-एक सुरक्षा रक्षण नेमण्यात येणार आहे.
    – वैजयंता उमरगेकर, नगराध्यक्षा, आळंदी नगरपालिका

Leave A Reply

Your email address will not be published.