आळंदीत एक लाखाचा दंड वसूल

आळंदी- राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही आळंदी शहरात सर्रासपणे विक्रेते व व्यापरी प्लॅस्टिक वापर होते. त्यामुळे आज (गुरुवारी) शहरात प्लॅस्टिक निर्मुलन मोहिम राबविण्यात आली असून यात 22 ठिकाणी प्लॅस्टिक वापरले जात असल्याचे आढळून आल्याने ते प्लॅस्टिक, प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा दंड वसूल आला आहे, अशी माहिती आळंदी नगर पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
आळंदीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे व आळंदी नगर पालिकेच्या संयुक्‍त विद्यमाने आज बाजार परिसर, श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर परिसर, मरकळरस्ता, गावठाण परिसरातील हॉटेल, स्टेशनरी दुकाने, स्विट होम, कापड व्यवसायिक, किराणा दुकाने, मॉल, प्रसादाची दुकाने आदी ठिकांची तपासणी करण्यात आली, यात 22 ठिकाणी प्लॅस्टिक वापरल्याचे आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, पुणे कार्यालयातील अधिकारी डॉ. एच. डी. गंधे, प्रादेशिक अधिकारी, डॉ. अरविंद धपाटे, क्षेत्र अधिकारी, समीर वस्त्रे, क्षेत्र अधिकारी यांचे अधिपत्याखाली तसेच आळंदी नगर पालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे, सहाय्यक लेखा परीक्षक राजेश पवार, सहाय्यक विधी व कामगार पर्यवेक्षक रामदास भांगे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, आरोग्य विभाग प्रमुख मालन पाटोळे, रमेश थोरात, भागवत सोमवंशी, मनोहर बोरगे, विलास पवार, शशी चव्हाण आदींनी यात सहभाग घेतला.

कारवाईत सातत्य ठेवणार -भूमकर
राज्यामध्ये संपुर्ण प्लॅस्टिक बंदी लागू केलेली आहे. त्यानुसार प्लॅस्टिक वापर करणे, साठवणूक करणे याकरिता दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे. याबाबत नगर पालिके मार्फत विक्रेते, व्यापरी व नागरिक यांना जाहिर आवाहन करण्यात आले होते. तर नगर पालिकेमार्फत वेळोवेळी तपासणी मोहीम राबविलेली असून विक्रेत्यांकडे सापडलेल्या प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची कारवाई करणेत आलेली आहे. दरम्यान, या कारवाईत सातत्य राखण्यात येणार असल्याचे आळंदी नगर पालिकेचे मुख्याधिकारी भूमकर यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)