आळंदीचे स्वीकृत नगरसेवक गावडे यांचा राजीनामा

आळंदी- आळंदी नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक संतोष गावडे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असून पक्षादेशानुसार आणि आपण सहखुशी ने राजीनामा देत असल्याचे गावडे यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय भेगडे यांच्या आदेशानंतर संतोष गावडे यांनी राजीनामा दिला आहे. गावडे यांची सहा महिन्यांपूर्वीच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपच्या गोटातून निवड करण्यात आली होती. त्यांनी आपला राजीनामा पुणे निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे दिला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर आणि आळंदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पुढील स्वीकृत नगरसेवक पदी निवड होण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. यात शहराध्यक्ष भागवत आवटे, दत्तात्रय काळे, एकनाथ मोरे, ऍड. आकाश जोशी, किरण येळवंडे, इतर अनेक इच्छुक असून भेगडे आणि तालुका अध्यक्ष अतुल देशमुख हे कोणत्या नावावर शिक्कामोर्तोब करणार हे पाहणे औत्स्युक्‍याचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.