आलियाबरोबर बरोबरी करणे कंगणाला कमीपणाचे वाटते

“स्टुडंट ऑफ द इयर’, “हायवे’, “2 स्टेटस’, “हम्प्टी शर्मा की दुल्हनियां’, “कपूर ऍन्ड सन्स’, , “बद्रीनाथ की दुल्हनिया’, “राजी’ आणि “गली बॉय’ सारख्या सिनेमांमधून आपल्या अभिनय क्षमतेची चुणूक दाखवणाऱ्या आलिया भटच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला आता 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 6 वर्षात आलियाने ज्या सातत्याने प्रगती केली आहे, तशी कदाचितच एखाद्या ऍक्‍ट्रेसला करता आली असेल.

आलियाबाबतचे सगळ्यांचे चांगलेमत असू शकेल मात्र आलियाबद्दल कंगणाचे तिच्याबाबत फारसे काही चांगले मत बनलेले नाही. कारण कंगणाच्या “मणिकर्णिका’बाबत आलियाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. तिने तर आलियाला “करण’ची कठपुतली असे म्हणून हिणवलेही होते. आलियासारख्या ऍक्‍ट्रेसबरोबर तुलना करणे आपल्यासारख्या एखाद्या खऱ्या खुऱ्या अभिनेत्रीला कमीपणाचे वाटते, असेही कंगणा बिनदिक्कतपणे म्हणाली आहे.

“गली बॉय’सारख्या सिनेमातल्या रोलमध्ये अनुकरण करण्यासारखे काय आहे. तिच्याबरोबर माझी तुलना अजिबात करू नका. बॉलिवूडमधील फिल्मी स्टार किड्‌सना अगदी डोक्‍यावर चढवून ठेवले आहे, हेच खरे आहे. अशा शब्दामध्ये कंगणाने आलियाबाबतचा राग व्यक्‍त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.