अभिनेत्री आलिया भट्टच्या आगामी “राझी’ चित्रपटातील दुसरे गाणं “दिलबरो’ सध्या व्हायरल होत आहे. यूट्यूबवर भारतात हे गाणं नंबर 7 वर ट्रेडिंग होत आहे. प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने हे गाणं गायले आहे. तर या गाण्याचे शब्द कविवर्य गुलजार यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे बोल प्रत्येक बाप-लेकीच्या मनाला स्पर्श करणारे आहेत. ते असे…
“उंगली पकड़ के तूने, चलना सिखाया था न
दहलीज ऊंची है ये पार करा दे
बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हूं तेरे दिल का
एक बार फिर से दहलीज़ पार करा दे
मुड़ के न देखो दिलबरो’
आपल्या मुलीला बिदाई देतानाचं हे गाणं असून ते अतिशय भावूक आहे. राझी एका काश्मिरी मुलीची कथा आहे. या मुलीला पाकिस्तानात भारताची गुप्तहेर म्हणून पाठवले जाते. आलिया भट्टने आपल्या ट्वीटरवर हे गाणं पोस्ट केले आहे. या गाण्यात आलिया भट्टची खरी आई सोनी राजदानही दिसून येते.
मेघना गुलराज यांच्या “राजी’ चित्रपटात सोनी राजदान प्रथमच आपल्या मुलीसोबत झळकणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण काश्मीर, पंजाब आणि मुंबई या शहरांमध्ये करण्यात आले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा