आर्थिक विकासासाठी दक्षिण अशियात सुरक्षेचे वातावरण आवश्‍यक – सुषमा

न्युयॉर्क – दक्षिण आशियातील शांतता आणि सुरक्षा यासाठी परस्पर सहकार्य आणि आर्थिक विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. या परस्पर पूरक बाबी आहेत. असे भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. न्युयॉर्क मधील संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेसाठी त्या आल्या असून त्यानिमीत्ताने साऊथ एशियन असोसिएशनच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. दक्षिण अशियातील विकासासाठी सुरक्षेच्या वातावरणाला महत्व देण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.

सार्क ही संघटना दक्षिण अशियातील शेजारील देश असलेल्या सहा देशांची संघटना आहे त्यात पाकिस्तान आणि भारत हे महत्वाचे देश सदस्य आहेत. त्या म्हणाल्या की दहशतवादामुळे या भागातील शांतता आणि स्थैर्याला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या दहशतवादाचे उच्चाटन करणे याला प्राधान्य देण्याची गरज आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की सार्क ही कार्यक्षम आणि परिणामकारक संघटना व्हावी अशी आमची इच्छा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तथापी त्या उद्दिष्टात केवळ एकाच देशाने मोठा अडथळा आणला आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले. त्यांचा रोख भारताच्या दिशेने होता पण त्यांनी त्यात भारताचे नाव घेतले नाही. सार्क ही संघटना स्थापन करण्याचे उद्दीष्टच या देशाने धुळीला मिळवले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)