आर्थिक धोरणात देशाची पत खालावली – आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड – देशात साखरेचे अपेक्षित उत्पन्न असताना देखील मोदी सरकारने पाकिस्तानी साखर आयात केली आहे. हा देशातील शेतकऱ्यांवर अन्याय असून सरकारने शेतमालाच्या आयात-निर्यातीचे धोरण चुकवल्यामुळे त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यातच आतंरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक धोरणांमध्ये देशाची पत खालावली झाली आहे. उद्योगपतींनी कर्जे बुडवण्याचा उद्योग करून देशातून पळ काढला असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे उत्पादकांपेक्षा ग्राहकांना जपण्याचे सरकारचे चुकीचे धोरण घेवून देश व राज्यातील सरकार चालले असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

गोंदी (ता. कराड) येथे विविधविकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, इंद्रजीत चव्हाण, यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, नितीन पाटील, दिपक पाटील, सरपंच जयाताई मदने, माजी उपसरपंच विलासराव पवार, भगवानराव पवार, मारुती मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारने साखरेची आयात केल्यामुळे ऊस उत्पादन व दुध उत्पादन उद्योग अडचणीत आला असल्याने शेतकऱ्यांचे खूप हाल चालले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साखर कारखान्यांना शेतकऱ्यांला एफआरपी पूर्णपणे देता येईल की नाही याबाबत शंका आहे. तसेच दुधाचीही अवस्था असल्याने शेतकरी आणि सहकार क्षेत्राबाबत सरकार उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याविरोधात कर्नाटकामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. हळूहळू हेच बदलाचे वारे देशभर पसरेल.

भाजपाकडून पश्‍चिम महाराष्ट्राच्या विकासनिधीला कात्री
राज्यातील सरकार पक्ष्चिम महाराष्ट्राच्या विकासनिधीला जाणूनबुजून कात्री लावत आहे. आम्हाला सभागृहामध्ये भाजपचे नेते पक्ष्चिम महाराष्ट्रात खूप विकास झाल्याचे सांगतात. व जास्तीत जास्त विकासनिधी विदर्भासह मराठवाड्याकडे वळवला जात आहे. भाजप सरकार विकासाबरोबर पक्ष्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीजेचे कनेक्‍शन देण्यामध्येही दुजाभाव करत आहे. नागपूराकडे 48 तासात शेतीसाठी नवीन वीजकनेक्‍शन मिळते, मात्र पक्ष्चिम महाराष्ट्रात वर्षाहून अधिक काळ उलटून गेला, तरी नवीन वीजजोडणी केली जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)