आर्थिक गुन्हेगारांना हादरा देण्यासाठी… (भाग-१)

भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारे उद्योगपती नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी आणि विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाची वाट आपण बऱ्याच दिवसांपासून पाहात आहोत. भारतीय बॅंक व्यवस्था मोडकळीस आणणाऱ्या या फरार मंडळींना भारतात आणण्याचे स्वप्न कधी साकार होईल, हे आताच सांगता येणार नाही; परंतु त्यांना सुखानेही राहता येणार नाही, याचाही बंदोबस्त करायला हवा.

आर्थिक गुन्हेगारांना हादरा देण्यासाठी… (भाग-२)

पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मेहुल चोक्‍सी याला भारतात परत आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचाच अर्थ आर्थिक गैरव्यवहार करून फरार होणाऱ्या मंडळींना भारत सरकार सहजासहजी सोडणार नाही, हे निश्‍चित झाले आहे. सीबीआय आणि ईडीचे अधिकारी मेहुल चोक्‍सीला कॅरेबियन देशातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या क्रमवारीत अन्य हीरे व्यापारी जतिन मेहताला देखील अशाच प्रकारच्या मुसक्‍या बांधण्यात येणार आहेत. मेहुल चोक्‍सीबरोबरच नीरव मोदीचे देखील प्रत्यर्पण करण्याची तयारी केली जात आहे. जर वास्तविकरीत्या असे काही घडले आणि सीबीआय आणि ईडीचे अधिकारी हे तिघांना आणण्यात यशस्वी ठरत असतील तर ती भारताची ही मोठी उपलब्धी असेल. यातून आर्थिक गैरव्यवहार करून देशाबाहेर पळ काढणाऱ्यांना कडक संदेश जाईल. गैरव्यवहार करणारे मंडळी कोठेही लपले असतील तर त्यांना भारत सरकार सहजासहजी सोडणार नाही, असे चित्र जगात निर्माण होईल.

– अॅड. प्रदीप उमाप

Leave A Reply

Your email address will not be published.