आरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपपत्र 

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरण : तपास यंत्रणांची न्यायालयात माहिती . 

मुंबई  –
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणास अपयशी ठरलेल्या तपास यंत्रणांनी अखेर आरोपींविरोधात आठवड्याभरात पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी ग्वाही उच्च न्यायालयात दिली. एसआयटी कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला, तर सीबीआय पुण्यात 13 फेब्रुवारीला हे पुरवणी आरोपपत्र दाखल करेल, अशी माहिती सीबीआय आणि एसआयटीने न्यायालयात दिली.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये ऑगस्ट 2013 मध्ये, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी कोल्हापूरात अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

या हत्याकांडांची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी दोन्ही तपास यंत्रणांनी आपल्या तपासाचा सीलबंद प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. तसेच प्रकरणात पुढील आठवड्यात एसआयटी कोल्हापुरात 12 फेब्रुवारीला, तर सीबीआय पुण्यात 13 फेब्रुवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल करेल, अशी माहिती विशेष तपास यंत्रणा (एसआयटी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) या दोन्ही तपास यंत्रणांच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, पुरवणी आरोपत्र दाखल झाले म्हणून तपास थांबवू नका. फरार आरोपींचा शोध सुरूच ठेवा, असे निर्देश देत याचिकांची सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब ठेवली.

सीबीआयने पत सांभाळायला हवी

डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआयचा हायकोर्टाने आज पुन्हा चांगलाच समोचार घेतला. पश्‍चिम बंगालमध्ये सीबीआयच्या बाबतीत घडलेल्या नाट्यावर मुंबई उच्च न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने आपली पत स्वत: सांभाळायला हवी, असा सल्लाही दिला. सध्या समाज माध्यमांवर प्रत्येक गोष्टीचे पडसाद मोठ्या तीव्रतेने उमटतात. केवळ आशियातील शेजारी राष्ट्रांचेच नाही तर संपूर्ण जगाचे भारतातील घडामोडींवर लक्ष असते. हे लक्षात ठेवा. तसेच या दोन्ही तपासयंत्रणांनी फरार आरोपींच्या शोधासाठीची आपली व्याप्ती अधिक प्रगल्भ करण्याची गरज असल्याचे मतही न्याययालयाने व्यक्त केले. या हत्याकांडातील आरोपी ऐवढी वर्षे मोकाट आहेत, याचा अर्थ त्यांना समाजातूनच सारी रसद पुरवली जात आहे. याचा पुनरूच्चार करून तपास यंत्रणांचे कान टोचले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)