आरोग्यदायी जांभूळ…

मोसमात बदल झाल्यानंतर बाजारात येणारी जांभळं खाण्यापासून स्वतःला रोखू नका. मधुमेहात जांभळाचा रस किंवा जांभूळ खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरू शकते.

गुठळ्याही कामाच्या
मधुमेह असलेल्यांनी दररोज जांभूळ खायला हवेत. यामुळे ग्लाइकेमिक इंडेक्‍स कमी होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. जांभूळ जितके फायद्याचे आहे, तितकेच त्याच्या गुठळ्या देखील लाभदायी आहेत. सावलीत जांभळांच्या गुठळ्या वाळवाव्या. गुठळ्या पूर्णपणे वाळल्यानंतर त्याची वस्त्रगाळ पावडर करून घ्यावी. जांभळांचा मोसम गेल्यानंतर दह्यासोबत किंवा नुसती ही पावडर प्राशन करावी.

दातांना बळ
जांभळांच्या गुठळ्या, लवंग, मिरे यांची पूड करावी.त्याचे चांगले मंजन बनवून घ्यावे. रात्री या मंजनापासून दात स्वच्छ करावे. त्यामुळे दात बळकट होतील. इतकेच नव्हे तर तोंडाचा वास देखील दूर होण्यास मदत होईल. जांभळाची पाने चावल्यामुळे देखील दातांना फायदा होतो.

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ
जांभळामुळे रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. यात फायटो केमिकल्स, ऍण्टी ऑक्‍सीडन्ट रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लाभदायक ठरतात. जांभळात भरपूर प्रमाणात आयर्न मिळते. त्यामुळे लोहाची कमी असणाऱ्यांनाही जांभूळ वरदान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)