‘आरे वाचवा’ मोहिमेला मनोज वाजपेयीचा पाठिंबा

मुंबई – ठाण्यातील आरेमधील मेट्रो कारशेडसाठी होणारा विरोध काही थांबण्याच नाव घेताना दिसत नाही. आरेच्या या जागेला सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकरांसह अनेक समाजिक संस्था ‘आरे वाचवा’ मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेला अनेक कलाकारांचा पाठिंबा वाढताना दिसत आहे. यामध्ये आता अभिनेता मनोज वायपेयीनेही सहभागी झाला आहे, त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आरे वाचवा’ मोहिमेला दर्शवला आहे.

“मुंबईमध्ये आरे जंगल, गुरुग्राममध्ये अरावली, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट…विकासाच्या नावाखाली जंगल नष्ट करण्याचे अनेक वाईट परिणाम होणार आहेत. आता वेळ आली आहे. आपण उत्तर देण्याची. तुम्ही सगळ्यांनी २० ते २७ सप्टेंबर या दरम्यान आपआपल्या शहरांमध्ये होणाऱ्या ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक इंडियामध्ये सहभागी व्हा”, असे ट्विट करून त्याने नागरिकांना आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.