“आरटीओ’ची सायकल रॅलीतून वाहतूक जनजागृती

पिंपरी – उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एम. आय. डी. सी. वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्ताने बुधवारी (दि. 6) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सायकल रॅलीत प्रियदर्शनी शाळेतील 325 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. रॅलीची सुरूवात सकाळी नऊ वाजता भोसरी पोलीस स्टेशन ते इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील व वाहतूक पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरूवात केली. नगरसेविका योगिता नागरगोजे उपस्थित होत्या. आरटीओ अधिकारी, वाहतूक पोलीस आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली.

रॅलीसाठी आरोग्य विभाग संचालक पुणे यांनी बी.व्ही.जी. या संस्थेमार्फत रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली होती. दरम्यान सायकल रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी हेल्मेट किती महत्त्वाचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. आनंद पाटील पुढे म्हणाले की, सायकल चालवत असताना हेल्मेट वापरले जाते. तर, मोटार सायकल वापरण्यापूर्वी हेल्मेट घालायलाच हवे. दिवसें-दिवस मोटार सायकल अपघाताचा आकडा पाहता वाहतूक नियम पाळणे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आरोग्य राखण्याबरोबरच पर्यावरण व इंधन बचतीसाठी सायकल चालवा, सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. रॅली यशस्वी करण्यासाठी आरटीओचे मुख्य लिपीक अनिल निगडे, भरत कांबळे, स्मिता गोसावी, विजय अडसूळ, अशोक भांगरे आदींनी परिश्रम घेतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)