आरटीईच्या संकेतस्थळावर आता अनुदानित शाळाही दिसणार

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार देण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर आता शासकीय तसेच अनुदानित शाळांची माहिती देखील जाहीर केली जाणार आहे. या शाळांना शिक्षण हक्‍क कायदा लागू होत नसला तरीही पालकांना आपल्या परिसरात नेमक्‍या कोणत्या शाळा उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ही यादी जाहीर केली जाणार आहे.
सद्यस्थितीत आरटीई 25 टक्‍के कोट्यातील प्रवेशादरम्यान केवळ विनाअनुदानित शाळांची यादी दिसते. याच शाळांना 25 टक्‍के जागा राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत. अनुदानित शाळांना हा नियम लागू नाही. मात्र आपल्या परिसरात नेमक्‍या कोणत्या शाळा आहेत अनेकदा याचीच माहिती पालकांना नसल्याने पालक दूरच्या शाळांसाठी अर्ज करतात. त्यामुळे अर्थातच पालक व विद्यार्थ्यांची परवड होते.
याचबाबत नागपूर खंडपीठ तसेच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यामध्ये काही पालक असे होते त्यांच्या घरापासून एक ते तीन किलोमीटरच्या आत सरकारी किंवा अनुदानित शाळा असुनही केवळ त्यांना याची माहितीच नसल्याने त्यांची सहा पेक्षा जास्त किलोमीटरच्या शाळा निवडल्या. त्यानंतर या याचिकेवर एकत्रित सुनावणी करताना उच्च न्यायालयाने शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अनुदानित तसेच शासकीय शाळांचीही माहिती देण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून या शाळाही पालकांना अर्ज करताना दिसणार आहेत. या शाळांमध्ये आरटीईनुसार प्रवेश मिळणार नसेल तरीही त्या शाळांमध्ये थेट जाऊन पालक प्रवेश घेऊ शकतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)