आरक्षित जागेवरच भाजी मंडईसाठी प्रयत्न करू

गणेश रहाणे ः उद्या अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन करणार गांधीगिरी

आळंदी-तीर्थक्षेत्र आळंदीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथे प्रशस्त अशा भाजी मंडईची आळंदीकरांसह भाविकांसाठी देखील नितांत गरजेची बाब आहे; मात्र स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाकडून याकडे लक्ष देण्यास आजवर कोणाला वेळच भेटली नाही, हीच तर मोठी आळंदीकरांसाठी शोकांतिका ठरली आहे.
आळंदीकरांची ही प्रशस्त भाजी मंडईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आता मैदानात उतरलो असून हा ज्वलंत प्रश्न सोडविल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व आजच येथील टपरी पथारी हातगाडी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेले गणेश रहाणे यांनी सांगितले. शासनास खडबडून जागे करण्यासाठी हे आमचे पहिले पाऊल असून, गुरुवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता चाकण चौक येथे 1984 साली भाजी मंडईसाठी आरक्षित असणाऱ्या जागेत गेली कित्येक वर्षे पालिकेच्या ठेकेदारीतून पार्किंगचा व्यवसाय सुरू आहे. त्याच ठिकाणी अधिकारी-पदाधिकारी यांना गुलाबपुष्प देऊन (गांधीगिरी करुन) संबंधितांपुढे आमच्या आरक्षित जागेच्या भाजी मंडईचा प्रश्न सोडविण्याची विनंती करण्यात येईल. प्रशासनास त्यासाठी एक महिन्याचा अवधी देऊन, या आरक्षित जागेवर भाजी मंडईचीच उभारणी करण्यात यावी, अन्यथा आम्हांला सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल असेही गणेश रहाणे यांनी सांगितले.
सध्या आळंदीमध्ये नवीन नगरपालिकेच्या पिछाडीस व ग्रामीण रुग्णालयाशेजारी भाजी मंडई अनधिकृतपणेच भरविली जात आहे. त्या ठिकाणी अनंत समस्या निर्माण झालेल्या असताना देखील याकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष मल्हार काळे, सचिव एम. डी. पाखरे, प्रसिद्धी प्रमुख अशोक पांढरे, खजिनदार शिवाजी मुसळे, सदस्य भगवान लेंडघर, विजय धुंडरे, शिवाजी जगताप, गोरख देसले आदी उपस्थित होते.

  • सन 2015साली राष्ट्रीय फेरीवाला धोरण समितीच्या सर्व्हेक्षणानुसार सर्व टपरी पथारी हातगाडी वर व्यवसाय करणाऱ्यांचा सर्व्हे करून प्रशस्त अशी भाजी मंडई ही याच जागेत उभी करावी अशी संघटनेची पहिली मागणी असेल, अन्‌ ती पुर्ण करून घेतल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही.
    -गणेश रहाणे, कार्याध्यक्ष टपरी-पथारी-हातगाडी संघटना
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)