आरक्षण न देणे हे सरकारचे अपयश

निवृत्तीनगर- मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार वेळकाढूपणा करीत आहे. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र द्यायला सरकारने 17 महिन्यांचा विलंब लावला. राज्यातील आंदोलने व मोर्चांना सरकार सामोरे जात नाही हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य सत्यशील शेरकर यांनी केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत कॉंग्रेसच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर. सी. वळवी यांना निवेदन देण्यात आले. तसेच मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या जुन्नर बंदला पाठिंबा देण्यात आला.
जुन्नर येथे आज (दि. 31) कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला., त्यावेळी शेरकर बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष अशोक घोलप, ज्येष्ठ नेते भिमाजी गडगे, तालुका उपाध्यक्ष मारुती वायाळ, सुभाष गावडे, संघटक रामदास महाबरे, सुखदेव नेहरकर, मंगलदास सोलाट, योगिता शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ह्यावेळी जिल्हा कमिटी सदस्य सुनिल ढवळे, देवेंद्र खिलारी, वैभव कोरडे, पंचायत समिती उपसभापती उदय भोपे जिल्हा युवती अध्यक्ष प्रिती शिंगोटे, उपाध्यक्ष शांताताई कुटे, महिला तालुकाध्यक्ष अर्चना भुजबळ, विघ्नहरचे संचालक विठ्ठल काकडे, कुंडलिक गायकवाड, बाळासाहेब शिंगोटे, युवक अध्यक्ष धनराज डुंबरे, नितीन दांगट, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जुन्नर विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास जुन्नर विधानसभेची जागा कॉंगेसला मिळून सत्यशिल शेरकर यांना उमेदवारी मिळावी याबाबतचा प्रस्ताव मंगलदास सोलाट यांनी मांडला व त्याला ज्येष्ठ नेते भिमाजी गडगे व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा दिला. तर सत्यशिल शेरकर म्हणाले की, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षांची आघाडी झाल्यास जुन्नर विधानसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी आपण वरिष्ठ नेत्यांकडे करणार आहोत, असे सांगितले. दरम्यान, जुन्नर तालुक्‍यात युवक कॉंग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानात 7800 युवकांची नोंदणी झाली तसेच सर्व कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या शक्ती ऍपच्या माध्यमातून डिजीटल नोंदणीदेखील करावी, असे आवाहन सत्यशिल शेरकर यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन दत्तात्रय गाडगे तर प्रदिप थोरवे यांनी आभार मानले.

  • मराठा समाजाच्या आरक्षणावर वारंवार चर्चेचे गुऱ्हाळ लावून झुलविण्याचे काम सरकार करीत असल्यामुळे सत्तेतील तसेच विरोधी पक्षातील बहुतेक आमदार सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. तरी शासनाने मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय जाहीर करावा तसेच सध्या सुरु असलेले अटकसत्र थांबवून मराठा आंदोलकांवरील गुन्हे बिनशर्त तात्काळ मागे घ्यावेत.
    -सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)