आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील – ना.शिवतारे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. ते मिळविण्यासाठी आवश्‍यक त्या कायदेशीर बाबींची पुतर्ता करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मात्र, प्रक्रिया सुरू असताना काही समजाकंटक मात्र युवकांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या युवकांनी , इतर राज्यात माथी भडकल्याने युवकांच्या भविष्यात काय अडचणी निर्माण झाल्या हे जाणिवपूर्वक पहावे.त्याचा विचार करावा.अशा वर्तनाने त्यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होते हे जाणून घेवून डोकी शांत ठेवली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. सातारा शहराला,जिल्ह्याला असलेली पुरोगामी विचारसरणींची प्रतिमा आणि राजकीय प्रगल्भतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे ही विजय शिवतारे यावेळी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)