आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक

ठिकठिकाणी आंदोलने सुरू : चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच

बारामती- धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यातील विविध पक्षांच्या माध्यमातून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे, त्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी बारामतीतील प्रशासकीय भवनसमोर सामाजिक कार्यकरत्या कल्याणी वाघमोडे यांनी उपोषण सुरू ठेवले आहे. उपोषणाचा आज (शनिवारी) तिसरा दिवस असून प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून देखील या उपोषणाकडे दुर्लक्ष होत आहे. धनगर समाजात याबाबतची चिडनिर्माण झाले असून उपोषणाची दखल घेत नसल्याने प्रशासन व सरकारचा निषेध केला जात आहे. तर प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार वाघमोडे यांनी केला आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या अन्यथा आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत धनगर समाज भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी बारामती येथे आमरण उपोषण सुरू ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते एडवोकेट विजय मोरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धनगर समाजाचे नेते विश्‍वास देवकाते, कार्यकर्ते गणपतराव देवकाते आणि उपोषण करतात कल्याणी वाघमोडे यांची उपोषणादरम्यान भेट घेतली तसेच पंढरपूर-पुणे-जामखेड-नळदुर्ग येथील धनगर समाजातील नेत्यांनीदेखील वाघमोडे त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×