आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी: पंतप्रधान नरेंद्र मोदी 

वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन 
नवी दिल्ली:आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ कार्यक्रमातून सांगितले. तसेच अतिवृष्टीसह देशातील विविध समस्यांवर भाष्य करताना मोदींनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व अधोरेखित केले.
संतोष काकडे नावाच्या व्यक्तीने मोदींना पंढरपूरविषयी प्रश्न विचारला होता. विठूरायाचं दर्शन घेणे हा एक वेगळा अनुभव आहे. महाराष्ट्रातील पंढरपूरमध्ये आषाढ महिन्यात वारी निघते. या वारीत लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. ही वारी म्हणजे शिक्षण, संस्कार आणि श्रद्धेचा त्रिवेणी संगम आहे. पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाण्यासारखा दुसरा आध्यात्मिक आनंद नाही. आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मोदींनी केले.
पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनी देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धेविरुद्धच्या लढाईला बळ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच लोकमान्य टिळक यांचे स्मरण करत आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात, आनंदात गणेश उत्सव साजरा करावा. अगदी मनापासून सगळे कार्यक्रम करावेत. परंतु सर्वांनी “इको-फ्रेंडली’ म्हणजेच पर्यावरण स्नेही गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
थायलंडमधील घटनेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, संपूर्ण पाण्याने आणि अंधाराने भरलेल्या, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये गुहेत अडकलेल्या किशोरवयीन खेळाडूंनी शांतपणे आणि धैर्याने या परिस्थितीला तोंड दिले. या घटनेने दाखवून दिले की, मानवता ज्यावेळी एकजूट होते, त्यावेळी अशा अद्भुत गोष्टी घडतात. मात्र त्यासाठी फक्त आपण शांत आणि स्थिर मनाने परिस्थितीचा सामना करावा लागतो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)