आयुक्‍तांच्या अनुपस्थितीने स्थायी सदस्य हैराण

पिंपरी – महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेला महापालिका आयुक्तांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे सदस्यांना समाधनाकारक माहिती मिळत नाही. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लावण्यास मर्यादा येत असल्याची तक्रार स्थायी सदस्यांनी केली. आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे स्थायी सदस्य पुरते हैराण झाले आहेत. स्थायी समितीच्या सभांना आयुक्त हर्डीकर नियमितपणे हजेरी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी या सदस्यांनी केली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीकडून शहरातील विविध विकासकामांच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली जाते. या महत्वाच्या समितीच्या सभांना प्रशासन प्रमुख म्हणून महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मात्र, या ना त्या कारणास्तव ते स्थायीच्या सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर हे उपस्थित राहतात. मात्र, विचारलेल्या प्रश्‍नांची आष्टीकरांकडून समाधनकारक उत्तरे मिळत नसल्याची सदस्यांची तक्रार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत राजू मिसाळ म्हणाले की, शहरात 36 हजार एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रलंबित आहे. उर्जा बचतीसाठी केंद्र सरकारने नेमलेल्या संस्थेकडून या दिव्यांची खरेदी करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने मागणी नोंदविल्यानंतर तीन ते पाच महिन्यांच्या कालवाधीनंतर हे दिवे टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. मात्र, याकरिता महापालिका देखील टप्प्या-टप्प्याने निधी देणार असल्याने या संस्थेकडून किती कालावधीमध्ये हे एलईडी दिवे उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती उपलब्ध करुन देण्याविषयी मागूनह माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही. आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे अनेक विषयांची माहिती मिळत नाही. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे महापालिकेच्या 22 लहान-मोठ्या विभागांचा पदभार सोपविण्यात आला असल्याकडे सागर आंगोळकर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे एखाद्या विभागाची माहिती मागितल्यास वेळेत उपलब्ध करुन दिली जात नाही. आयुक्त या सभेला उपस्थित नसल्याने बहुतांशी अधिकारी ही बैठक गांभिर्याने घेत नसल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. अर्चना बारणे यांनी शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)